सध्या लग्नाचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे तो म्हणजे “डिजिटल लग्न” आता हे लग्न नेमकं काय असतं? कसं असतं? कशा पद्धतीने करायचं असतं? साहजिकच असे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतीलच . विवाह ही एक आपली संस्कृती आहे. परंपरा आहे प्रत्येक धर्मामध्ये विवाहाच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी एकूण विवाह जुळवण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच आहे. .पूर्वीच्या काळी म्हणजे फार तर दहा पंधरा वर्षांपूर्वी संस्कृती परंपरेने जपलेला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे मध्यस्थ हा होता. मात्र स्वतःसाठी परावलंबी झालेल्या लोकांनी या मध्यस्थाच्या घरावर दगड आणणे सुरू केले. नको त्या चालीरीती आणायला सुरुवात केली .आणि इथेच नेमका पचका होत गेला .
डिजिटल लग्न : फेसबुक जोडीदार व्हीडिओ पहा

मोफत लग्न अक्षदा हेतू ,उद्देश ,भूमिका ,कार्यपद्धती इ विषयी अधिक जाणून घ्या
म्हणजे नेमकं काय? तर लग्न जुळवणारा मध्यस्थ हा स्वतःची बैल किंवा म्हैस खुट्याला बांधून ठेवून स्वतःचे पेट्रोल खर्च करून स्थळ दाखवण्यासाठी पुढाकार घ्यायचा . जर तो मुलीकडचं स्थळ दाखवत असेल आणि पुढे लग्न जुळल्यावर त्या मुलीला आहेर ,अंधन भांडं पण स्वतःच्या खर्चाने घेऊ लागला. मात्र यात आपण बेमानपणा कसा केला तर ,लग्न लागते वेळी आपण आठ-दहा डझन राजकारण्यांचा सत्कार केला, मात्र मध्यस्थ जेवला की उपाशी आहे याची आठवण सुद्धा आपण ठेवली नाही.लग्न झालं नवरी वाटी लावली कि मध्यस्थचा रोल संपला. आणि मग मध्यस्थाचा खरा रोल पुढे सुरू झाला …! केव्हा तर सहा महिन्याने एखादी मुलगी आपले ओरिजनल स्वभावगुण दाखवायला लागली…!
किंवा गुनवान, कर्तुत्वान मुलगा दिवाळीची पहिली साडी फाटल्यावर दिड लिटर दारू पचवायला लागला. तेव्हा जे काही केलं ते मध्यस्थानच केलं म्हणून , सगळं खापर त्या मस्थावर फोडलं जाऊ लागलं. हे असे प्रकार घडत गेल्याने हा मध्यस्थ काहीसा बाजूला फेकला गेला . बरं लग्नात आपण नको ते चाळे म्हणजे पायंडे रुजवणे सुरू केले.म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस वर्षांपूर्वी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असलेली वरातीची प्रथा यामागचा उद्देश हा की गावाला सुनेचे मुख म्दिहणजे तोंड दिसावं म्हणजेच सुनमुख! यासाठी वरात काढली जायची.मग सुरुवातीला सनई चौघडाची जागा बँड बाजा ने घेतली.मग त्यात चौकात गाणी तोडली जाऊ लागली. गाणी तोडता तोडता नाचे आले.नाचणारे आले दारू पिऊन झिंगणारे आले. झिंगता ,झिंगता भांडणं होऊ लागली.पुंग्या मोडल्या जाऊ लागल्या, वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचू लागले. आणि ही प्रथा बंद पडली.आता त्याची जागा आता परण्याने घेतली .अशा व इतर अनेक कारणामुळे उगाच रिस्क नको म्हणून हा मध्यस्थ दुआ बाजूला पडला गेला मग त्याची जागा विवाह संस्था ,दलाल ,सोशल मेडिया साईटसने घेतली .आज अनेक जण फेसबुक, इंस्टाग्राम, WhatsApp ग्रुप्स आणि अँप्सवरून लग्नाची स्थळ शोधतात.किंवा विवाह संस्थेचा लग्ना साठी आधार घेतात.

चड्डी शिवणारे – मारणोत्तर दिखावे..! click करा व हे हि वाचा
परंतु यातून खरंच लग्न जुळतात का?जुळले तर ते टिकतात का?हा प्रश्न खर तर कधीच चर्चेला येत नाहीत्यावर पडलेले “फिल्टर” आणि “बनावट स्टेटस” हा एक फसवणुकीचा बाजार झाला आहे.एखादी मुलगी अनेक ठिकाणी “आईवडील नाहीत” म्हणून सहानुभूती मिळवते, तर एखादा मुलगा “NRI” म्हणून स्वतःचं खोटा बायोडाटा विकतो.काही काही मुलींचा बायोडाटा नातेवाईकाकडून, विवाह संस्थेकडून किंवा एखाद्या दलाला कडून एखाद्या ग्रुप वर येतो, आणि मग त्या बायोडाटा साठी सुरू होतो अपेक्षांचा भडिमार, अपेक्षा काय? अमके स्थळ चालेल का? तमके चालेल का? वीस वर्षाची मुलगी असेल तर 48 वर्षाचा गोल घेवडा पण प्रश्न टाकतो घटस्फोटीत चालेल का?
यामुळे त्या मुलीचे पालक किंवा नातेवाईक या प्रश्नाच्या भडीमाराला कंटाळतात. शेवटी आपला फोन स्विचऑफ करून सिम कार्ड फेकून देतात.बायोडाटा मात्र ग्रुप वर तसाच असतो.नव्हे तर या ग्रुप वरून त्या ग्रुप वर त्या ग्रुप वरून त्या ग्रुप वर फिरत असतो त्या मुलीचे परस्पर लग्नही होते तिला मूलबाळही होतात तरीही तो बायोडाटा फिरतच असतो. एके काळी लग्नासाठी आजूबाजूच्या आत्या,मावश्यां,मामा,काका कडे चौकशी केली जायची, आता ‘फेसबुक सर्च’मध्ये “सुसंस्कारित वधू” टाईप केल्यावर १०,०० बायोडाटा सापडतात –

आणि त्यातल्या निम्म्या मुली अनाथ आश्रमातील असतात (अर्थात, फक्त नावापुरत्या).तर काहींचं “आईवडील नाहीत, फक्त चांगला नवरा पाहिजे,शेतकरी चालेल ,जातीची वयाची अट नाही ,अर्जेंट लग्न करणे आहे ” अशी दर्दभरी कहाणी असते.आणि गंमत म्हणजे, यात ‘रजिस्टर मॅरेज’, ‘कोर्ट मॅरेज’, ‘लव्ह स्टोरी’, ‘हनीमून’ लिव्ह इन रिलेशन सगळं काही अगदी पॅकेजसारखं असतं – आणि हे सगळं पाहून रील्स पाहून पाहून ज्ञानदृष्टी जागृत झालेली, मोबाईल हातात घेतच जन्मलेली तरुणाई लगेच गुगल बाबा कडं जातं – “A1 orphan girls for marriage near by me”. type करतात .फसतात अन पुन्हा वरतून फसवणुकीच्या नावाने बाजारात मनगटाला तेल लाऊन बोंबलत फिरतात .हे बनावट आहे हे सांगण्यासाठी आम्ही “मराठा लग्न अक्षदा” वर आम्ही एक व्हिडिओ टाकला. विषय होता – “अनाथाश्रमातील फसवणुकीची लग्नस्थळं”. ५ लाख लोकांनी तो पाहिला. पाहिला म्हणजे काय? शीर्षक बघितलं, चहा घेतला, आणि आमच्यावरच प्रश्नांची वाफ काढायला सुरुवात! “तुमच्याकडे अनाथ मुली आहेत का?” “कुठून बोलता?”
“दोन मुली हव्यात, शिकलेल्या असतील तर सांगा!” एक दिवसात १०-१५ फोन यायचे. काहींनी तर विचारलं –“तुमच्या कडच्या मुलींचं रेट काय?” काही वेळा आम्ही चिडून सांगितलं – हो आहेत, पण त्या तीन वर्षाच्या आहेत – दत्तक घेण्यासाठी! त्यावर समोरून – “आम्हाला लग्न करायचंय, – आणि वरतून आम्हालाच दोन शिव्या घालून मोकळे होणारे महाभाग पण आम्ही पहिले व ऐकले
सध्या लग्नाचा हा एक नवीन ट्रेंड प्रचंड गाजतोय –
डिजिटल लग्न! होय…
फेसबुक, इंस्टाग्राम, WhatsApp, अॅप्स आणि वेबसाईट्स –
जिथे प्रेम होतं स्क्रीनवर…लग्न ठरतं स्टेटसवर…
आणि ब्रेकअपही होतं फक्त ब्लॉक करून! लिव्ह इन रिलेशन चा धोका वाढतोय वेळीच सावध व्हा …तुम्हाला काय वाटते ते खाली कॉमेंट मध्ये कळवा आवडले तर share करा
(अस्वीकृती व स्पष्टीकरण):
वरील लेख सामाजिक निरीक्षण आणि अनुभवांवर आधारित असून त्याचा उद्देश फक्त जनजागृती करणे हाच आहे.कोणत्याही व्यक्ती, संस्था, अॅप, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अथवा धार्मिक वा वैयक्तिक भावना दुखावण्याचा यामध्ये कुठलाही हेतू नाही.लेखातील उल्लेख, उदाहरणे आणि पात्रे केवळ प्रबोधनात्मक आहेत. यांचा कुणाशीही थेट संबंध असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.वाचकांनी सदर लेखातील विचार स्वतःच्या विवेकबुद्धीने आणि जबाबदारीने स्वीकारावेत.वास्तविक निर्णय घेताना नेहमी खात्रीशीर माहिती व कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे आहे.
✍️ लेखक परिचय:
गजानन खंदारे
कार्यकारी संस्थापक – मराठा लग्न अक्षदा
(रिसोड – वाशिम / अमरावती / पुणे)
– सामाजिक विवाह मार्गदर्शन व फसवणूकविरोधी जनजागृती करणारा डिजिटल उपक्रम
तब्ब्ल 4 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यावर काळी कारवाई !कशासाठी?https://kamachya-goshti.com/?p=521