चड्डी शिवणारे – मरणोत्तर दिखावे ! पटतंय का पहा ..!.

आजच्या युगात माणूस स्वतःसाठीच जगतो. फार तर नाहीच जगणं झालं तर अर्ध्यावर डाव मोडून झाडाला लटकतो!
मग त्याच्या मृत्यूनंतर समाजासाठी आदर्श उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूपर्यंत खोट्याचा पाठलाग करण्यासारखं आहे.
अर्ध्या आयुष्यात आत्मघात करून राखेत विझलेल्या “अवसानघातकी” व्यक्तीबद्दल नेमका कुठला आदर्श उभा करायचा?मरणोत्सवाची ही नवीन प्रथा समाजात रुजत चालली आहे….

.©गजानन खंदारे

माझं सूत्रसंचालन प्रभावी आहे, म्हणून बऱ्याच कार्यक्रमात मला बोलावतात. “खूप छान बोललात!” म्हणत हातात हात देतात. तेवढ्या पुरतं बरंही वाटतं!

अगदी मरणदारा पासून तोरणदारीपर्यंत बोलावणाऱ्यांची संख्या हल्ली बरीच वाढली आहे.

जिवंतपणीच ‘स्वर्ग’ नाकारलेल्या माणसाला मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळवून देण्यासाठी धडपड करायची असते ,ही विसंगती मांडताना, मेलेल्या व्यक्तीविषयी खरंच काय बोलायचं?

हा खरा प्रश्न विझुन थंड झालेल्या राखेला सतावत असतो!

आजच्या युगात माणूस स्वतःसाठीच जगतो. फार तर नाहीच जगणं झालं तर अर्ध्यावर डाव मोडून झाडाला लटकतो!
मग त्याच्या मृत्यूनंतर समाजासाठी आदर्श उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूपर्यंत खोट्याचा पाठलाग करण्यासारखं आहे.

अर्ध्या आयुष्यात आत्मघात करून राखेत विझलेल्या “अवसानघातकी” व्यक्तीबद्दल नेमका कुठला आदर्श उभा करायचा?

मरणोत्सवाची ही नवीन प्रथा समाजात रुजत चालली आहे…..

अनेक ठिकाणी ना रक्ताचं नातं, ना विचारांची जवळीक—मग मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीसाठी स्वर्ग मिळवून देण्यासाठी आपण इतकी धडपड का करतो? आयुष्यभर ज्यांनी स्वतःपुरतंच जगणं पसंत केलं, त्यांच्या विषयी ओढूनताणून आदर्श उभा करणं म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर खोटं बोलण्याचं पाप आपल्या नावावर घेणंच नाही का?

मरणाचं ‘उत्सवकरण’ ही हल्ली एक नवीच फॅशन झाली आहे.

विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, आजी-माजी कार्यकर्ते , खोटाखोटा शोकसंदेश पाठवणारे भांडवलदाराचे दलाल, हफ्तेखोर कारकून — अशी लांबलचक यादी राखेतून अस्थी वेचल्यागत काढली जाते. मग त्या माणसाला स्वर्ग मिळेल का नाही, हे माहीत नाही; पण सूत्रसंचालक मात्र त्या ‘पवित्र’ पापाचा एकटाच धनी होतो!

मृत्यूचं तांडव स्मशान मंचावर सांगून झाल्यावर, स्मशानापुरती विरक्त झालेली माणसं थेट मोबाइलवर स्टेटस अपडेट करताना दिसतात…!
मग माझंही मन क्षणभर गहिवरतं—तिच्या त्या अखेरच्या दर्शनात दिसलेल्या पांढऱ्या कपाळावरच्या प्राक्तन रेषा आठवून! त्या रेषा, ज्यात जगण्याच्या हजार शक्यता हरवून गेलेल्या असतात…!

गजानन खंदारे रिसोड

गरिबांची लग्न जुळविणारी काही देव माणसे

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
trackback

[…] चड्डी शिवणारे – मारणोत्तर दिखावे..! click करा व हे हि वाचा […]