नाथ-देवांच्या घोषणात,दादांचा हिशेब चुकला! कर्जमाफीच्या यादीतून नेमका सातबाराच हुकला !
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं – “सातबारा कोरा ” म्हणजे कोराच करू ! याचा अर्थ आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना समजलाच नाही “कोरा…कोरा…कोरा” असं ताम्हणातील पाणी पंचपळीने उजव्या हातावर घेऊन आमच्या देवा भाऊंनी तीन वेळा उच्चारण करून संकल्प सोडला, तसा खूप वर्षापूर्वीच हा संकल्प सोडलेला, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा म्हणजेच…
