“काय बोलता काका! आमच्या लग्नातला तर एकच फोटो आहे, त्यातही अर्धे लोक धूसर! आणि आता पोरं लग्नाआधीच फोटोशूट करतात, त्यात कोणी नदीत मंदाकिनी होऊन गंगा धुतीय, तर कोणी दगडावर बसून टारझन गाणी म्हणतोय!
तेव्हढ्यात सादा पाटलाची नवी सून..मधीच थांबत बोलली..
“म्हणजे आबाजी, फक्त फोटो काढणं म्हणजे संस्कृतीचा र्हास नाही. प्रेम व्यक्त करणं चुकीचं नसतं. ते दाखवण्यासाठीच असतं,
विचारांने आणि शिक्षणाने माघारलेली लोक याला उगाच नाव ठेवतेत –म्हणे फाजील खर्च…!,
मागल्या वर्षी तुम्ही आमच्या लनाचं शूट पाहिलं ना! किती संयमित होतो आम्ही !”फोटोशूट दरम्यान एकमेकांच्या स्पर्शाने उत्तेजित झालेल्या भावनेचा संयम आपण कसा ढळू दिला नाही याची जाणीव सादा पाटलाच्या सुनेने जोडली.
पटतंय का पहा ! ✍ गजानन खंदारे (रिसोड वाशिम)
दुपारच्या
उन्हाची धार थोडी कमी झाली होती, तरी हवेत अजूनही उन्हाळी सुस्तपण भरलेला.
वडाच्या पारावर दत्ता काका जुनाट रुमालाचे मळवट गुंडाळून बसले होते. हातात जुनं बीडीचं थोटुक, डोळे अर्धवट ग्लानी आल्यागत मिटलेले –
तेवढ्यात, समोरून संदीप सायकलवरून येताना दिसला. कॉलर उडवलेली शर्ट, गळ्यात हेडफोन, आणि हातात मोबाईल.
काकांना राहवलं नाही,ओठाला बीडी लावतच ते बोलले,
“ए संदीपा! थांब जरा, इकडं ये बघू.”
संदीप सायकल थांबवत हसतच जवळ आला,
“बोला काका, कसं काय म्हणता?”
दत्ता काका हाताने पारावर जागा देत,
“बस जरा इथे. काल तुमच्या वावरातल्या वडाच्या झाडाखाली काय सुरु होतं म्हणायचं?
शेळ्या ढवळताना फुलं फेकून फोटू काढत होती पोरं ! लग्न ठरलंय की कसलं मोबाईल सिनेमाचं शुटिंग म्हणायचं?”
संदीप हसत
“अरे काका, तो प्री-वेडिंग शूट होता. शहरात तर हे फार कॉमन झालंय आता. लग्नाच्या आधी फोटोशूट करून आठवणी जपतात, कुटूंब कोर्टात खटला झाला की कामाला येतात हया आठवणी”
संदीपा काहीसा कुत्सितच बोलला.
पण काकांना काही कळलं नाही त्यांनी फक्त एक दीर्घ उसासा टाकला. समोर मळ्यावर जनावरं उभी फिरत होती, आणि आकाशात एक ससाणा भिरभिरत होता.
कर्जमाफी मुख्यमंत्र्याची घोषणा! लाभासाठी हे करावेच लागणार
दत्ता काका
“आठवणी ठेवायच्या म्हणा. पण लग्नाआधीच इतकं एकत्र? आमच्या काळात नवरीचं नावसुद्धा कुणी सहज घेत नव्हतं. एकमेकांना पाहणं म्हणजे ‘भानगड झाली’ असं वाटायचं लोकांना.”
तेवढ्यात मन्नू काका पण येऊन बसला
अन हसून मधी बोललाच.
“काय बोलता काका! तुमच्या काळातलं, पोरगी लग्न झाल्यावर शहाणी व्हायची, तेही खोबऱ्याच्या वाटीवर वर बसून, आता लेकरं आधीच शहाणी सुरती झालेली,
लग्नाआधीच फोटोशूट करतात,
म्हणुन
त्यात कोणी नदीत मंदाकिनी होऊन गंगा धुतीय, तर कोणी दगडावर बसून टारझन गाणी म्हणतोय!”
“तुमचं बरोबर आहे, पण काळ बदलतोय. लोक आता दादा कोंडक्याची बर्मुडा टाकून ओपन झालेत..
त्यांच्या प्रेमातलं प्रामाणिकपण फोटोत दिसतं. आणि ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे असतात – इतरांना दाखवायला नाही, तर आठवणी म्हणून ठेवायला.”
संदीपानं खुलासा जोडला
140पैकी 100 कोटी लोक गरीब का?जाणून घ्या उपाय
तेव्हढ्यात सादा पाटलाची नवी सून जनाआत्या सोबत डबा घेऊन झाडा फिरायला जाताना मधीच थांबत बोलली..
“म्हणजे आबाजी, फक्त फोटो काढणं म्हणजे संस्कृतीचा र्हास नाही. प्रेम व्यक्त करणं चुकीचं नसतं. ते दाखवण्यासाठीच असतं,
विचारांने आणि शिक्षणाने माघारलेली लोक याला उगाच नाव ठेवतेत –म्हणे फाजील खर्च, तोंडाला तोंड लावणं या सारखी रिकामी नाटकं, हे कसं चुकीचं वाटतं नाही का? मागल्या वर्षी तुम्ही आमच्या लग्नाचं शूट पाहिलं ना! किती संयमित होतो आम्ही कॅमेऱ्यात..!”
फोटोशूट दरम्यान एकमेकांच्या स्पर्शाने उत्तेजित झालेल्या भावनेचा संयम आपण कसा ढळू दिला नाही याची जाणीव सादा पाटलाच्या सुनेने जोडली.
“अगं बाळा, भावना समजतो मी. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला, की ती पोकळ होते. आणि आपल्या गावात तर लोक कर्ज काढून हे शूट करतात म्हणे! मोकळ्या विचाराचा मोकळा श्वास घेण्यासाठी लगीन लागल्यावर ही पोरं पोरी पळून जातात म्हणे! ते बघून काळजी वाटते….
दत्तू काका श्वास रोखून पुन्हा बोलले
“बघा, जुनं-नवं याची टोकाची भांडणं करून काही उपयोग नाही. परंपरा जपणं गरजेचं, पण नव्या गोष्टी आत्मसात करणंही तितकंच महत्त्वाचं. प्रश्न हा नव्याचा नाही, अंधानुकरणाचा आहे. सामाजिक सभ्यतेचा आहे… धार्मिक,पारंपरिक, सांस्कृतिक, सामाजिक नैतिक मूल्यांचा होणारा रास थांबला पाहिजे “
एव्हाना दत्तू काकाला दम लागला होता, त्यांनी वीझलेली बिडी पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न केला
सादा पाटलाच्या सुनेच फ्री वेडिंग शूटिंगच्या इव्हेंटचे व दत्तू काकाच्या नैतिकतेचे गुऱ्हाळ सुरू होण्यापूर्वीच संदिपाने तिथून काढता पाय घेतला.
विचारांचं उकळपाणी झरलं तरच बदल होतो ‘– बदलाला नाकारणं चुकीचं, आणि परंपरेला विसरणंही चुकीचं. प्रेम आणि आदर आणि सभ्यता, हेच आपल्याला दोघांना जोडतात असा विचार करत करतच दत्तू काका आता नजरे आड गेला होता
© blog.lagnaakshda.com

- सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा तपास: अंगणवाडी सेविकांचे नवे मिशन?
- “लग्न जुळत नाही… जुळलं तरी टिकत नाही! – दोषारोपांचा खेळ की खरं समाधान?”
- लग्न अक्षदा नोंदणी व कार्यपद्धती
- डिजीटल लग्न:फेसबुक आणि व्हॉट्सॲप जोडीदार
- ८५ वर्षांच्या आजोबाला तरुणी गटली! पण लग्नाच्या शोधात कसे झाले पहा …
मराठा लग्न अक्षदा वधूवर group clik here
