६२ घराच्या गावातल्या ती १० पोर !


✍ पटतंय का पहा!

परवा आमच्या शिक्षक मित्रासोबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा. भुसारी साहेब यांच्याकडे बसलो होतो.
सहा वाजता ऑफिस संपल्यानंतरही आमच्यात चौघांमध्ये हा माणूस तासभर न थकता बोलत राहिला.
अर्थात, राजकारणावर नव्हे तर शिक्षण आणि त्यातील सुधारणांवर.

दुर्दैवाने आज शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी आणि दृष्टीकोन असणारी माणसे दुर्मिळ झाली आहेत. त्याला काही अपवाद नक्कीच असतील.
कौतुकाचा विषय म्हणजे
आमच्या शेजारच्या कणेरीसारख्या फक्त ६२ घरांच्या छोट्याशा गावात नवोदय प्रवेश परीक्षेत 3 व शिष्यवृत्ती परीक्षेत १० विद्यार्थी पात्र ठरले!
हे यश निश्चितच आपल्या “कर्तव्याप्रती निष्ठा” ठेवून काम करणाऱ्या शिक्षकांच्या मेहनतीचे आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे.

मुली व महिला गायब होत आहेत त्यापेक्षा लग्न करणे काय वाईट!

दोन वर्षांपूर्वी, शाळा बचाव परिषदेच्या निमित्ताने या शाळेला भेट देण्याचा योग आला होता.
१९ पटसंख्येच्या काठावर असलेली ही शाळा आपल्या अस्तित्वासाठी झगडत होती.
एका बाजूला भौतिक सुविधांचा अभाव असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, आणि दुसऱ्या बाजूला स्टेटस सिम्बॉल म्हणून वाढत असलेल्या खाजगी शाळा — अशी ही गुणवत्ता भासलेली अजब स्पर्धा !

गरिबांची लग्न जुळविणारी काही देव माणसे

त्यावेळी आम्ही विविध स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्या, पालक, गावकरी आणि शिक्षक यांच्यात जाणीवजागृतीचं “टॉक्सिनचं इंजेक्शन” देण्याचा प्रयत्न करत होतो.
पण दुर्दैवाने मास्तर-Key अंगात असलेले जिल्ह्यातील अनेक शिक्षक, बहुतांश पालक, आणि झाडून पुसून सारेच लोकप्रतिनिधींनी या प्रयत्नाकडे पाठ फिरवली.

तरीही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शिक्षणतज्ज्ञांनी आणि काही समर्पित शिक्षकांनी ही आंतरराज्य परिषद मोठ्या दमदारपणे उभी केली.
परिणामी, झक मारून केसरकरांना दखल घ्यावी लागलीच आणि १५०० शाळा बंदचा निर्णय लांबणीवर पडला.

आज त्याच परिश्रमांचे फळ म्हणून आमच्या कन्हेरी शाळेचे १० विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्रता यादीत आले आहेत.
यामागे शिक्षकांनी कर्तव्य म्हणून घेतलेल्या विशेष परिश्रमांचे मोठे योगदान आहे.
पण त्याहीपेक्षा ज्या पालकांनी कन्हेरीसारख्या शाळेत आपल्या मुलांना शिकवण्याचे धाडस दाखवले, त्या पालकांच्या मानसिकतेचे आणि धैर्याचे विशेष कौतुक करायला हवे!

अनाथ आश्रमातील स्थळे कशी असतात?

त्याहीपेक्षा अधिक अभिमानाचा क्षण म्हणजे — ज्या शाळेने मला आयुष्यात पहिल्यांदा अक्षरे गिरवायला शिकवले, त्या शाळेप्रती उतराई म्हणून औरंगाबाद येथील एम.पी. विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य ऍड. श्रीकिसन मोरे यांनी डिजिटल वर्ग निर्मितीसाठी शैक्षणिक साहित्याचा भर घातला.
या माझ्या मित्राच्या योगदानाचा मला विशेष अभिमान वाटतो!

—- ——–

©गजानन खंदारे
शाळा बचाव समिती, वाशिम

लग्न अक्षदा whatsup group साठी खालील imageवर स्पर्श करा

click करा 👆👆

तुम्हाला सुद्धा अनाथ आश्रमातील स्थळ हवे काय? सावधान! विवाह फसवणूक टाळा!

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments