लग्न जुळत नाहीत ही समस्या नाहीच !

आजकाल लग्न जुळत नाहीत ही समस्या कुठल्याही एका गावाखेड्याची नाही किंवा एखाद्या शहराची नाही.

व एखाद्या विशिष्ट समाजाची सुद्धा नाही

ही समस्या तुमची आमची सर्वांचीच समस्या बनलेली आहे

मग यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात.

त्यासाठी मग मुलींचे भाव वाढले पालक भाव खातात असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा व टिंगल टवाळी करण्यापेक्षा या समस्येवर सर्वांनी मिळून काय उपाय करता येईल यावर चर्चा होणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते.

यामध्ये प्रामुख्याने गोरगरीब शेतकरी कष्टकरी अशा सर्वांचीच लग्न जुळली पाहिजे..

अशी इच्छा शक्ती ठेवायला काही हरकत नसावी.

आणि त्यासाठी सर्वांनी मिळून एकमेकांसाठी प्रयत्न केले पाहिजे.

मात्र असे प्रयत्न करण्याऐवजी किंवा मदत करण्याऐवजी

फसवणूक करणारे तत्व अधिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत

व गोरगरिबांची, महिलांची फसवणूक करत आहे.


खरं सोडून खोट्याच्या मागे लोकं कशी फसतात!लग्नाचा बाजार Clik here

गेली सहा वर्षे आम्ही मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून लोकांना फसवणुकीपासून सावध करणे

व लग्न जुळण्यासाठी एकमेकांना कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करणे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो.

या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही.

लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी या हेतूने आम्ही जे वेगवेगळे न उपाय सुचविले आहेत

त्यातून हमखास लग्न जुळतील असं नाही परंतु कुणाची पैशाने फसवणूक होणार नाही याची काळजी आम्ही घेतो

व यासाठी आम्ही कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही

गेल्या दिवाळीपासून मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आम्ही एक परिचय सदर सुरू केले आहे

यातून नुसताच परिचय नाही तर एकमेकांसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही करत असतो

तेव्हा अशा परिचयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सामाजिक सभ्यता व गोपनीयतेच्या हिशोबाने मेंबर साठी असलेल्या सदरातून आम्ही काही परिचय देण्याचा प्रयत्न करत असतो

मग यामध्ये प्रामुख्याने विधवा घटस्फोटीत गरीब घरच्या मुली यांना विवाहाची गरज आहे व चांगल्या स्थळांची…
आता चांगल्या म्हणजे ची मुले गुणवान आहेत कर्तुत्ववान आहेत निर्वेसनी आहेत अशांना आम्ही चांगले समजतो.

पैशाची चढ-उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात श्रीमंती ही मनाची असते स्वतःच्या वागणुकीची असते याला आम्ही श्रीमंती म्हणतो

गरिबी श्रीमंती आणि पैसा या कायम टिकणाऱ्या गोष्टी नसतात.

आपण सुद्धा खालील जॉईन बटन वर क्लिक करून सभासद होऊ शकता

त्यासाठी स्थळांचा परिचय देत असताना आम्ही स्थळासोबत संपर्क कसा करायचा याची माहिती देताना लग्न जुळण्यासाठी मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो.

हे करत असताना कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही कोणालाच पैशाची मागणी करत नाही
सोबतच आपण सुद्धा आपल्या ओळखीतील परिचयातील संपर्कातील मुलींचे बायोडाटा आमच्याकडे पाठवावेत की ज्यांना विवाहाची गरज आहे किंवा जे गरीब घरचे मुलं मुली आहेत अशी…

तेव्हा लग्नासाठी आपण जर प्रयत्न करत असाल तर एकमेकांची लग्न जुळावी या पुण्य मिळवण्याच्या हिशोबाने आपल्या परिचयातील नात्यागोत्यातील मित्र परिवारातील गोरगरीब घरच्या मुलींची स्थळे

विधवा विधुर परितक्त्या घटस्फोटीत इत्यादी कोणी परिचयातील स्थळे असतील तर आमच्याकडे पाठवा

आपण सर्व मिळून त्यासाठी योग्य जोडीदार शोधण्यासाठी प्रयत्न करू

लक्षात घ्या आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही

आम्ही कुणाचेही बायोडाटा परस्पर कुणालाही शेअर करत नाही

अधिक माहितीसाठी मराठा लग्न अक्षदा च्या वेबसाईटला भेट द्या किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या लिंक ला विजिट करा

आपल्या सूचना अपेक्षा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा

हा मजकूर योग्य वाटला असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा कमेंट करायला सुद्धा विसरू नका

मराठा लग्न अक्षदा Team


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *