लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? पटतंय का पहा! : गजानन खंदारे

पटतंय का पहा! kamachya-goshti.com

लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन?

✍️ गजानन खंदारे रिसोड

आजच्या घडीला लग्न म्हणजे एक सामाजिक समारंभ न राहता, ट्रेंडचा भाग बनला आहे. जो हा ट्रेंड फॉलो करत नाही, त्याला ‘मागासलेला’ समजलं जातं. विवाहमंडपात प्री-वेडिंग शूटची झगमग झळकते, पडद्यावर नवरा नवरीच्या गालावरचा मुका ओठांकडे कधी सरकतो हे दृश्य मांडवातल्या वऱ्हाडीना नकळत त्यात सामील होण्याची मानसिकता तयार करून जाते. पण या सगळ्यातून खरोखर कोणत्या सामाजिक जाणीवा समृद्ध होतात, हा प्रश्न कोणीच विचारत नाही.

आज लग्न म्हणजे केवळ एक कौटुंबिक विधी न राहता ‘व्हायरल’ होण्याचं साधन झालं आहे. ग्रामीण भागातही आता लग्नाला ‘पब्लिसिटी’ मिळणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. काल-परवाच सोशल मीडियावर एक नवरा-नवरी चर्चेत आले – त्यांनी ट्रॅक्टरवरून लग्नमंडपात प्रवेश केला होता म्हणे!या पूर्वीही कोरोना काळात काहींनी अशाच प्रकारची नाट्यमय प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. अनेक शेतकरी आणि मध्यमवर्गीय तरुणांच्या लग्नाच्या गाठी जुळत नाहीत आणि जुळल्या तरी त्या टिकत नाहीत.जर ट्रॅक्टरवरून मांडवात प्रवेश करणं हे शेतीशी असलेली नाळ जपण्याचा भावनिक प्रयत्न असेल, तर त्याला कोणीच विरोध करणार नाही. ही कृती शेतीशी अभिमानाने जोडलेली असली पाहिजे. पण जर हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी, ‘व्हायरल’ होण्यासाठी केलं जात असेल, तर ती गोष्ट नक्कीच उपहासास्पद आहे.शेतकऱ्याचं खरं जीवन हे ट्रॅक्टर शेतात चालवण्यात आहे – मांडवात नव्हे. अशा व्हायरल गोष्टींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी झाकोळल्या जातात.

ट्रॅक्टरवरून एन्ट्री करणं म्हणजे शेतकऱ्यांची समृद्धी असं चित्र सादर केलं जातं. आणि बाहेरून पाहणाऱ्यांना वाटतं – शेतकरी आता दिवाळीच्या दिव्या सारखा फार मोठ्या थाटात जगतोय!जर हेच चित्र सरकार आणि धोरणकर्त्यांनी खरं मानलं, तर शेतकऱ्यांनी मदतीसाठी हात पुढे करायची गरज उरणार नाही. पण वास्तव हे आहे की, कॅमेऱ्यासमोर हसणाऱ्या चेहऱ्यांआड पुढच्या हंगामासाठी खत विकत घेण्यासाठी उधारी मागावी लागते, हे कोणीच पाहत नाही.हा लेख म्हणजे अकारण निर्माण झालेला पोटशूळ नसून समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न आहे. अशा कृतींमधून आपण आदर्श शोधतोय की केवळ आडवळणाचे प्रसिद्धीमार्ग, हे ठरवणं आता समाजाच्या सजगतेवर अवलंबून आहे.

चड्डी शिवणारे – मारणोत्तर दिखावे..!

© kamachya-goshti.com

click here

प्रेरणा कोणाची..! पुरस्कार कोणाला?

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments