एकजण म्हणाला मी हिंदू
दुसरा म्हणाला मी मुसलमान
तिसरा म्हणाला मी ख्रिचन
चौथा म्हणाला मी बौद्ध
मी त्यांच्या मध्ये घुसलो आणि म्हणलं
मी भारतीय.. मी भारतीय…. मी भारतीय…
तर त्या सगळ्यांनी मला हाणला…
लई तुडवला हे भारतीय नवीन काय भानगड त्यांना प्रश्न पडला…

पण मी नाय चिडलो
अंग सावरत उठलो
आणि भारताची प्रतिज्ञा म्हणली
भारत माझा देश आहे…सारे भारतीय माझे बांधव आहेत…
त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या
आणि म्हणाले ही आम्ही शाळेत म्हणत होतो….
मग मी म्हणलं अरे हीच तर जगण्याची खरी गरज आहे आज या देशात
त्यांनी मला परत हाणला
त्यांच्या प्रत्येकाच्या धर्माचा दणका लई जोरात बसला

मंडळी मी आधी गोरा होतो
पण या धर्मवेड्या लोकांनी मला तुडवून
काळा केलाय
या कट्टर धर्मव्यवस्थेने करपवून मला काळं केलं आहे…..

असो मी अजून तुडवून घेईन
अजून काळा पडत जाईन
पण मी भारतात भारत पुन्हा पुन्हा पेरत राहीन…

भारतीय म्हणून आपली जात आणि धर्म सोडून माझ्यासोबत काळा व्हायला याल का…?
वाट पाहिन आपली…आलात तर जय भारत…

दंगलकार नितीन चंदनशिवे सांगली

हा माझा भाऊ — “दंगलकार”.
आधी लई गोरा होता! पण तो “भारतीय” म्हणत गर्दीत घुसायचा…
लोकं धर्माच्या नावावर त्याला तुडवायचे… पुन्हा पुन्हा…
एक दिवस मी त्याला म्हटलं — भैय्या, जात सांग… धर्म पेर… वाचशील!
पण तो ओरडत राहिला — “मी भारतीय! मी भारतीय!”
आणि पुन्हा पुन्हा हाणला गेला…

आज तो काळा दिसतो — पण ही काळसर छटा त्याच्या त्वचेची नाही…
ही काळी झालेली संवेदनशीलता आहे… समाजाने सोसलेल्या प्रत्येक लाथेची साक्ष आहे.

आणि तरीही… तो आजही भारत पेरतोय…
माझा अभिमान आहे — माझा भाऊ “दंगलकार” आहे!

गजानन खंदारे वाशिम

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
10 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Kamryn Uriah Cortez
1 month ago

You have a way of making each of your readers feel seen and heard That’s a special quality that not all bloggers possess Thank you for creating a safe space for us

Issac Alec Brixton Serrano

Thank you for sharing your personal experiences and stories It takes courage to open up and you do it with such grace and authenticity

Pedro N. Price
1 month ago

Your posts are always so well-written and thought out It’s evident that you put a lot of effort into each and every one

Kaya Celine Emma Costa

From the bottom of my heart, thank you for being a source of positivity and light in this sometimes dark and overwhelming world

Brice M. Sandoval
Brice M. Sandoval
1 month ago

This is such an important and often overlooked topic Thank you for bringing attention to it and offering valuable advice

Avalynn Molina
Avalynn Molina
1 month ago

This blog has opened my eyes to new ideas and perspectives that I may not have considered before Thank you for broadening my horizons

Chaya Jordynn Addisyn Carter
Chaya Jordynn Addisyn Carter
30 days ago

Your positivity and optimism are contagious It’s impossible to read your blog without feeling uplifted and inspired Keep up the amazing work

Ethan Olson
Ethan Olson
29 days ago

It means so much to receive positive feedback and know that my content is appreciated. I strive to bring new ideas and insights to my readers.

Amaya Emma Jennifer Harris
Amaya Emma Jennifer Harris
27 days ago

From start to finish, your content is simply amazing. You have a talent for making complex topics easy to understand and I always come away with valuable insights.