श्रध्येचा फराळ न भक्तीचा बाजार!

श्रध्येचा फराळ न भक्तीचा बाजार!

सकाळीच शेताला हळदीला जायचं, म्हणून तिने स्वयंपाक करून झाक पाक केली.
स्वयंपाकाचे खरकटे पाणी बाहेर म्हणून फेकायला गेली.
तेवढ्यात दबा धरून बसलेल्या वानराने टोपल्यातील सगळ्याच पोळ्या नेल्या.
बाईचा त्रागा ! अन शिव्यांची लाखोली!

गावात भागवत सप्ताह सुरु! अमलकी एकादशीचा सोहळा! भक्तीची गोडी, उपवासाची तयारी,मण आणि मनभरून फराळ!
दुसरे दिवशी देवाला नैवेद्य म्हणून पोळ्या… पण देवाऐवजी वानरभाऊनेच नैवेद्य स्वीकारला!

ही केवळ घटना नाही. ही श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या बाह्य आवडंबरांची सावली आहे. उपवासाच्या नावाने पोटभर साबुदाणा उसळ हाणणं, रात्री झोप येत नाही म्हणून अजून थोडंसं “उपवासाचं” खाणं, आणि सकाळी देवाला नैवेद्य देऊन उपवास “सोडणं” — यात भक्तीची तीव्रता आणि पोटपूजेची तिव्रता अधिक दिसते.

वानराने पोळ्या नेल्या म्हणजे देवाचं रूप समजावं की चुकून आलेलं सत्य?
देव श्रध्येचा,भावाचा विषय आहे, पण व्यवहार मात्र चोख खाण्याचा! श्रद्धा आज सामाजिक बाजाराच्या उत्सव प्रियतेत रूपांतरित झाली आहे
— इथे “उपवास” म्हणजे पोटभर फराळ आणि “भक्ती” म्हणजे बाह्य प्रदर्शन.
तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा… सांगणारे जगद्गुरू म्हणतात…
मन नाही निर्मळ, तेथे काय करील…
🙏🙏
पटतंय का पहा!
नाहीतर सोडून द्या

https://chat.whatsapp.com/DVlQwo41m0rAFJqpaZn45T

खालील imageवर click करा

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Learn German
6 months ago

This post really got me thinking. When you mentioned the ‘naivedya’ being taken by the monkeys, it was a perfect metaphor for how rituals sometimes lose their true significance. I think it’s essential to go back to the basics and practice faith with mindfulness, rather than for the sake of appearance.