विवाह फसवणुकीचे नवीन फंडे

वेळीच सावध रहा

विवाह नोंदणी साइट्सवर विवाह नोंदणीचे अनेक प्रकार वारंवार समोर येत असतात.

अनेकांची फसवणूक होऊन अनेकांचे घरे उध्वस्त झालेली आहेत .
तरीही लोकं स्वतःची नाती, गोती, मित्रपरिवार व मध्यस्थ यांना सोडुन विवाह संस्थेच्या नादाला लागत आहेत.

लग्नात मध्यस्था एवजी राजकारण्यांचा सत्कार करत आहेत.
त्याचीच फळे तुम्ही आम्ही भोगत आहोत.
विवाह नोंदणी साईटवरून घटस्फोटित महिलांची माहिती घेत त्यांच्याशी लग्न करून पैसे उकळणाच्या प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पंकज रमेश पाटील ओव्हळ, जि. पालघर याच्यासह त्याचे आईवडिल बहिणीसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ऑनलाईन विवाह नोंदणी साईटवरून घटस्फोटित महिलांची माहिती घेत पंकज रमेश पाटील याने विवाहीत असताना, अविवाहित असल्याचे भासवून उद्योग, नोकरी करणाऱ्या परित्याक्ता, विधवा महिलांना भूलथापा देत त्यांच्यासोबत लग्न करून लुटण्याचा सपाटाच लावल्याचे आढळून आले आहे.

जळगाव शहरातील रहिवासी ३७ वर्षीय महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पंकज पाटील त्याची आई रंजना पाटील, रमेश माधव पाटील या तिघांसह अन्य दोन, अशा एकूण पाच जणांनी घटस्फोटित पीडितेच्या मुलांनाही

संभाळण्याचे आश्वासन देत पंकज पाटील याने त्या महिलेशी लग्न केले. त्यानंतर या महिलेची सहा लाख रुपयांमध्ये फसवणूक करीत तिचा छळ केला.

जळगावातील महिलेशी लग्न केल्यानंतर तिला समजले, की त्याची पत्नी जिवंत असताना, इतर चार महिलांशीही त्याने लग्न केले आहे. तिने जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निरीक्षक कल्याणी वर्मा तपास करीत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments