विवाह फसवणुकीचे नवीन फंडे

वेळीच सावध रहा

विवाह नोंदणी साइट्सवर विवाह नोंदणीचे अनेक प्रकार वारंवार समोर येत असतात.

विवाह संस्थेच्या नावाखाली वाढती फसवणूक — आपण कधी जागे होणार?

अनेकांची फसवणूक होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत.
तरीही लोकं स्वतःची नातीगोती, मित्रपरिवार आणि विश्वासू मध्यस्थ सोडून आंधळेपणाने ऑनलाईन विवाह संकेतस्थळांच्या मागे धावत आहेत.

आज परिस्थिती अशी झाली आहे की,
👉 लग्नात मध्यस्थांना बाजूला सारून आपण राजकारण्यांचा सत्कार करत आहोत
👉 पण लग्नानंतर समस्या आल्यावर ते राजकारणी लोक कुठेच दिसत नाहीत

(👉 आपले मत कॉमेंट मध्ये लिहा )

आणि याचाच फायदा काही फसवणूक करणारे लोक घेत आहेत.
विवाह नोंदणी साईटवरून घटस्फोटित महिलांची माहिती घेत त्यांच्याशी लग्न करून पैसे उकळणाच्या एक प्रकार नुकताच समोर आला आहे.

या प्रकरणी पंकज रमेश पाटील ओव्हळ, जि. पालघर याच्यासह त्याचे आईवडिल बहिणीसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ऑनलाईन विवाह नोंदणी साईटवरून घटस्फोटित महिलांची माहिती घेत पंकज रमेश पाटील याने विवाहीत असताना, अविवाहित असल्याचे भासवून उद्योग, नोकरी करणाऱ्या परित्याक्ता, विधवा महिलांना भूलथापा देत त्यांच्यासोबत लग्न करून लुटण्याचा सपाटाच लावल्याचे आढळून आले आहे.

जळगाव शहरातील रहिवासी ३७ वर्षीय महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पंकज पाटील त्याची आई रंजना पाटील, रमेश माधव पाटील या तिघांसह अन्य दोन, अशा एकूण पाच जणांनी घटस्फोटित पीडितेच्या मुलांनाही

संभाळण्याचे आश्वासन देत पंकज पाटील याने त्या महिलेशी लग्न केले. त्यानंतर या महिलेची सहा लाख रुपयांमध्ये फसवणूक करीत तिचा छळ केला.

जळगावातील महिलेशी लग्न केल्यानंतर तिला समजले, की त्याची पत्नी जिवंत असताना, इतर चार महिलांशीही त्याने लग्न केले आहे. तिने जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निरीक्षक कल्याणी वर्मा तपास करीत आहेत.

❗ समाजासाठी धोक्याची घंटा

हे फक्त एक उदाहरण नाही…
👉 अशा शेकडो घटना दरवर्षी समोर येत आहेत
👉 विशेषतः घटस्फोटित / विधवा महिलांना टार्गेट केले जाते
👉 “एकटेपणा + भावनिक आधार” याचा गैरफायदा घेतला जातो

🛑 सावधगिरी — लग्न ठरवताना काय तपासाल?

1. ओळख आणि पार्श्वभूमी तपासा

  • आधार, पॅन, नोकरीचे पुरावे verify करा
  • त्याचे गाव, नातेवाईक प्रत्यक्ष भेटून खात्री करा
  • सोशल मीडिया तपासा (खरे आयुष्य दिसते का?)

2. लग्नाची घाई करणाऱ्यांपासून सावध

  • “लवकर लग्न करूया” म्हणणारे 90% संशयास्पद असतात
  • भावनिक बोलून निर्णय घ्यायला लावतात

3. पैशांचा व्यवहार टाळा

  • लग्नाआधी एक रुपयाही देऊ नका
  • “अडचण आहे, मदत करा” हा फसवणुकीचा common trap आहे

4. विवाह नोंदणी तपासा

  • आधीच लग्न झाले आहे का? याची खात्री करा
  • Marriage Certificate / Divorce Papers तपासा

5. ऑनलाईन साईटवर आंधळा विश्वास ठेवू नका

  • वेबसाईट फक्त माहिती देते, हमी नाही
  • verification स्वतः करणे गरजेचे आहे

✅ उपाय — आपण काय बदल केला पाहिजे?

✔ पारंपरिक मध्यस्थ पुन्हा महत्त्वाचे करा

विश्वासू लोक, नातेवाईक, गावातील ओळखी
👉 हे Google पेक्षा जास्त सुरक्षित आहेत

✔ समाजात जागृती करा

  • प्रत्येक गावात / समाजात मार्गदर्शन शिबिरे
  • महिलांसाठी विशेष सल्ला केंद्र

मराठा लग्न अक्षदा whatsup group साठी येथे click करा


Comments

2 responses to “विवाह फसवणुकीचे नवीन फंडे”

  1. khup khup dhanyvad

  2. Bhalchandra Avatar
    Bhalchandra

    Yes its true

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *