मराठा लग्न अक्षदा म्हणचे नेमके काय आहे? आधी कार्यपद्धती समजून घ्या.
गेली सहा वर्षे “मराठा लग्न अक्षदा ” हा एक मोफत सेवाभाव म्हणून सामाजिक “प्लॅटफॉर्म “आहे
👉 विवाह फसवणूकीपासून सावध करणे, विवाह विषयक समुपदेशन.
व विवाह जुळविण्यासाठी मदत करणे. हा या प्लॅटफॉर्म चा मुख्य उद्देश . .
या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का? . —- हो, नक्कीच! यातून विवाह जुळण्यास मदत होते. आज वर या प्लॅटफॉर्म वर ५०० पेक्षा अधिक विवाह जुळले आहेत.
तरी पण.. आम्ही विवाह जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून विवाह जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. किंवा कुठल्याच गोष्टी साठी आम्ही कुणाला पैशाची मागणी करत नाही.
” लक्षात घ्या लग्न म्हणजे online खरेदी करण्यासारखे सोपे नसते.एखाद्या विवाह संस्थे कडे नोंदणी केली म्हणजे विवाह जुळतो असे होत नसते .: मोफत बायो डाटा पाहण्यासाठी:मराठा लग्न अक्षदा कार्यपद्धती
मराठा लग्न अक्षदा मध्ये नोंद कशी करावी ? गुगल किंवा प्ले स्टोअर वर “मराठा लग्न अक्षदा” टाईप करा. ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी ने लॉगिन करा .
मराठा लग्न अक्षदाची नेमकी कार्यपद्धती कशी आहे? -प्रोफाईल नोंद झाल्यावर किंवा नोंद न करता सर्व बायोडाटा आपण निशुल्क पाहू शकता.एखादे स्थळ जर आपणास आपल्या ओळखीतील वाटत असेल तर अशा स्थळाशी संपर्क करा
लग्न अक्षदा फुकट आहे मग पॉईंट कशासाठी? मोबाईल न का दिसत नाहीत?
मराठा लग्न अक्षदा एक सामाजिक सेवाभाव म्हणून मोफत सांगितले जात असताना ॲपवर मोबाईल नंबर का दिसत नाहीत ? Read more..
किंवा पॉईंट्स कशासाठी लागतात?असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.त्या दृष्टीने गेल्या सहा वर्षांपूर्वी मराठा लग्न अक्षदा ची सुरुवात झाली तेव्हा व्हाट्स ग्रुप व अँप द्वारे सर्व काही खुले होते.
परंतु
वारंवार सांगत असतो की विवाह जुळून येणे म्हणजे ऑनलाइन खरेदी करण्या इतके सोपे नसते.
विवाह हे ओळखीत नात्यागोत्यात परिचयात किंवा सारख्या शिक्षणात सारख्या व्यवसायात होत असतात. मात्र सर्वच मोफत असल्याने त्याचे महत्त्व कळत नाही मग बारावी शिकलेला मुलगा सुद्धा एमबीबीएस डॉक्टरला रिक्वेस्ट पाठवू लागला फोन करून त्रास देऊ लागला
त्यामुळे नाईलाजाने हे नंबर आम्हाला हाईड करावे लागले
दुसरीकडे सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईनुसार काही पथ्य पाळावे लागतात कोणाचे नंबर उजागर करता येत नाहीत.: मोफत बायो डाटा पाहण्यासाठी:मराठा लग्न अक्षदा कार्यपद्धती
पॉईंट्स आणि रिक्वेस्ट ची कार्यपद्धती कशी आहे?
मोबाईल नंबर अदृश्य केल्यानंतर आपण कितीही रिक्वेस्ट पाठवू शकत होता मात्र वर सांगितल्याप्रमाणे सारख्या प्रोफेशनमध्ये विवाह जुळत असताना कोणी कोणालाही रिक्वेस्ट टाकू लागले Read More
उदाहरणार्थ पन्नास वर्षाचा घटस्फोटीत व्यक्ती 22 वर्षाच्या मुलीला सुद्धा रिक्वेस्ट टाकून अपेक्षा विचारू लागला मग सहाजिकच लोक त्रस्त होतात आणि मग त्याचे दगड अशा प्लॅटफॉर्मवर येतात. आता एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर नोंदणी केल्यावर तुम्ही दोन रिक्वेस्ट मोफत पाठवू शकता.त्यानंतर ॲपच्या होम पेजवर असलेल्या खालील सेटिंग बटन वर क्लिक करून त्या ठिकाणी शेअर अँप ची लिंक आहे ती लिंक आपल्या कुटुंबात नातेवाईकात मित्राला शेअर करू त्यावर मित्राला प्राप्त झालेला रेफरल कोड डाऊनलोड केल्यावर टाकायला सांगून त्याला ॲप डाऊनलोड करायला सांगावे तुम्हाला आपोआप एका रिक्वेस्ट चे पॉईंट मिळतात.दिवसभरात अशा दहा ठिकाणी ॲप शेअर केल्यास दहा रिक्वेस्ट चे पॉईंट मिळतात.
सोबतच खाली ब्लॉग सेक्शन आहे
त्यावर फसवणुकीपासून सावध करणारा समुपदेशन करणारा विवाह विषयक महत्त्वाचा मजकूर सातत्याने आणि प्रसिद्ध करत असतो.
तो आपण वाचावा व स्वतः सावध होऊन दुसऱ्याला सावध करावे या उद्देशाने सोशल मीडिया ग्रुप वर शेअर केल्यास त्या बदल्यात प्रत्यक्ष ला तुम्हाला पाच पॉईंट मिळतातकिंवा हे सर्व तुम्हाला करायचे नसेल
तर आपण आम्हाला वीस रुपये पन्नास रुपये मदत निधी देऊ शकता.
यातून एप्लीकेशन चे सर्व भाडे एसएमएस चार्जेस इत्यादीसाठी थोडाफार आर्थिक आधार होतो हाच उद्देश..: मोफत बायो डाटा पाहण्यासाठी:मराठा लग्न अक्षदा कार्यपद्धती
रिक्वेस्ट पाठवल्यानंतर प्रतिसाद किती दिवसात मिळतो?
आपण प्रोफाइल नोंदणी केली असेल किंवा नसेल तरीही आपण रिक्वेस्ट पाठवू शकता जर आपली प्रोफाईल नोंद असेल तर नोंद केलेला डाटा समोरच्याला दिसतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपला फोटो व बायोडाटा अपलोड करण्याची सुविधा सुद्धा आहे फोटो खाली असलेल्या रिक्वेस्ट बटन वर क्लिक केल्यावर ती रिक्वेस्ट एडमिन शिक्षण ला जाते दोन-तीन दिवसात तिची पडताळणी केली जाते जर प्रोफाइल विसंगत असतील.
तर त्या ठिकाणी तिथेच तर रिजेक्ट होता जर मिळत्या जुळत्या असतील तर ते रिक्वेस्ट समोरच्या व्यक्तीकडे पाठवली जाते प्रत्येक कृतीचा व्हाट्सअप ला मेसेज प्राप्त होतो प्रतिसाद येण्यास कधी कधी आठवडा लागू शकतो समोरच्या व्यक्तीकडून प्रतिसाद न मिळाल्यास फोन द्वारे विचारणा केली जाते.
यात बऱ्याचदा आठ दहा पंधरा दिवसाचा कालावधी जातो. समोरच्या व्यक्तीकडून रिक्वेस्ट बघितली गेली आणि प्रतिसाद मिळत नसला तरीही खाली असलेल्या रिक्वेस्ट सेक्शनला मोबाईल नंबर प्राप्त होतो. अशावेळी मोबाईल नंबर प्राप्त झाल्यावर सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने जेष्ठ व्यक्तीकडून फोन करावा.
उगाच असं भाषा किंवा सौदेबाजी केल्यासारखी भाषा बोलू नये
आपणही आमच्या या प्लॅटफॉर्मवर मध्यस्थ म्हणून जुळू शकता मराठा लग्न अक्षदा या सामाजिक प्लॅटफॉर्मचे ॲप सोबतच व्हाट्सअप ग्रुप आहे.
विदर्भ, मराठवाडा, मुंबई -कोकण, पुणे आणि नाशिक असे स्वतंत्र प्रत्येक विभागाचे पाच ग्रुप आहेत.
मात्र यात मागील अनुभव पाहता कोणी कुठल्याही ग्रुपमध्ये घुसते परिणामी ग्रुपचा कचरा होऊन जातो आणि विवाह जुळत नाहीत.
अशा स्थितीत
काही नियम आम्ही निश्चित केले आहेत.लग्न अक्षदा ॲपवर नोंद झालेल्या प्रोफाईलला आम्ही संबंधित विभागाचा ग्रुप जॉईन होण्यासाठी विनंती मेसेज पाठवतो. त्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करावा
इतर ग्रुप मधून जॉईन होण्यासाठी ओळखीची खात्री पटवणे आवश्यक असते.
आपण सुद्धा त्या ग्रुपचे ॲडमिन बनून नियमन करू शकता.
ग्रुप वर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकता
जेणेकरून कोणाची फसवणूक होऊ नये हा उद्देश!
व्हाट्सअप च्या माध्यमातून खरच लग्न जुळतात का? click

One thought on “मोफत बायो डाटा पाहण्यासाठी:मराठा लग्न अक्षदा कार्यपद्धती”