गेल्या आठ वर्षापासून मोफत सेवाभाव असलेल्या “मराठा लग्न अक्षदा” आपल्या कार्यपद्धतीत काहीसा बदल केला आहे. कृपया तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
आज का लग्न जुळत नाहीत, ही सर्वत्रिक समस्या बनली आहे.
या समस्येची उकल शोधण्याऐवजी आपण फक्त एकमेकांना दोष देत अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून व्यक्त करतो. स्वतः मात्र काहीच करताना दिसत नाही.
एखादा व्हाट्सअपचा ग्रुप जॉईन करतो आणि त्यावर बायोडाटा टाका, अमक्या जिल्ह्यातील टाका, असं करा, तसं करा असे आदेश आपण दुसऱ्याला सोडतो. स्वतः मात्र आपल्या नात्यातील एखादा बायोडाटा आपण स्वतः टाकत नाही.
विवाह हा संस्कार आहे असे सांगत असताना अलीकडे विवाह संस्थेच्या नावाने नुसता बाजार व खिचडी झाली आहे. आणि त्यातून लग्न जुळण्याचे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे.
लग्न अक्षदाचे कार्यरत असलेले विविध व्हाट्सअप ग्रुप यावर मी स्वतःची कामे सांभाळत असताना सतत नियंत्रण ठेवणे किंवा प्रत्येक गोष्टीला न्याय देणे शक्य नसते.
लग्न अक्षदा व्हाट्सअप ग्रुपमध्ये यापुढे दुसऱ्याला दोष देणाऱ्या किंवा इतर ज्ञान वाटणाऱ्या कॉपी-पेस्ट पोस्ट असणार नाहीत. विशेषतः “मुलींचे भाव वाढले”, “अपेक्षा वाढल्या” इत्यादी स्वरूपाचे मेसेज नसावेत.
सोबतच “अमक्या जिल्ह्यातील स्थळे आहेत का?”, “हे चालेल का?”, “ते चालेल का?” असे मेसेजही असणार नाहीत.
ग्रुपवर स्वतःचा बायोडाटा आणि त्यासोबत स्वतःचा परिचय व आवश्यक माहिती टाकावी. किंवा लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो, याबाबत समुपदेशन करू शकता, चर्चा करू शकता.
फक्त लग्न जुळत नाही म्हणून दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा, आपल्या कुटुंबातील किंवा नात्यातील एखाद्या विवाहयोग्य मुला-मुलीचा बायोडाटा आपण स्वतः पुढे आणला, योग्य स्थळाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवली आणि गरज असेल तेथे एकमेकांना सहकार्य केले, तरच या उपक्रमाचा खरा उद्देश साध्य होईल. “मराठा लग्न अक्षदा” हा कोणत्याही व्यक्तीचा दोष शोधण्यासाठी किंवा कोणावर अपेक्षा लादण्यासाठी नाही, तर विवाह इच्छुकांना योग्य माहिती, सहकार्य आणि सकारात्मक वातावरण मिळावे यासाठी सुरू केलेला सेवाभावी उपक्रम आहे. त्यामुळे आता प्रत्येक सदस्याने केवळ अपेक्षा न ठेवता स्वतःची जबाबदारी स्वीकारून या कार्यात सहभागी व्हावे, हीच नम्र विनंती.
गजानन खंदारे
जिल्हाध्यक्ष
संभाजी ब्रिगेड, वाशिम


Leave a Reply