येथे लग्न जुळतात कसे ? पहा पद्धती

गेली सहा वर्ष मोफत सेवाभाव म्हणून सुरु असलेल्या मराठा लग्न अक्षदाची कार्यपद्धती थोडक्यात समजून घ्या. खाली व्हिडिओ लिंक आहे व्हाट्स अप ग्रुप लिंक आहे त्यावर क्लिक करून माहिती घ्या.

आपण यापूर्वी मराठा लग्न अक्षदा कडे आपली प्रोफाइल नोंदण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो.

नोंदणी कशी करावी ? vdo पाहण्यासाठी click करा

मात्र अर्धवट माहिती असल्याने आपली प्रोफाइल तात्पुरती “अनव्हेरीफाय” केलेली असू शकते.
आपला सुरू असलेल्या व्हाट्सअप क्रमांकानेच लॉगिन करणे आवश्यक आहे
1 माझे प्रोफाईलवर क्लिक करून सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक असते. वाटल्यास सोबतचा तीन मिनिटांचा व्हिडिओ पहा.
माझे प्रोफाइल वर क्लिक करा 👉🏼
सर्व माहिती व्यवस्थित भरा
👉🏼
कौटुंबिक माहितीच्या बॉक्समध्ये आपल्या कुटुंबाविषयी, स्वतःविषयीं संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहा.
उदरणार्थ- आमचे घर साधे आहे. मी शेतकरी आहे, कुटुंबात ऑटो, किराणा इत्यादी व्यवस्थित लिहा.

👉🏼
खाली तीन फोटोसाठी बॉक्स दिसतात.
त्यावर पहिल्या बॉक्समध्ये नवऱ्या मुलाचा मुलीचा व्यवस्थित असलेला फोटो अपलोड करा.

👉🏼 नंबर दोन स्वतःच्या घराचा व्यवसायाचा किंवा स्वतःचा दुसरा फोटो अपलोड करा.

सर्वात खालच्या फोटोवर आपले ओळखपत्र खात्रीसाठी व पडताळणीसाठी अपलोड करणे आवश्यक आहे.
ओळखपत्र मध्ये पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन किंवा स्वतःच्या सत्यतेबाबत माहिती देणारा पुरावा.
वाटल्यास त्यावरील क्रमांक खोडू शकता.

👉🏼
खालील नियम व अटीचा छोटा बॉक्स टिक करून सबमिट करावे.👉🏼
त्यानंतर एक-दोन दिवसात आमच्याकडून आपणास व्हाट्सअप मेसेज येतो.

👉🏼 लग्नासाठी कोणीही आम्हाला फोन करू नये आम्ही विवाह जूळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न होतात असा दावा आपण कुठेच करत नाही.

आमची कार्यपद्धती समजून

आमची कार्यपद्धती समजून घ्या
मराठा लग्न अक्षदा हे फुकट आहे असे सांगत असताना आम्हाला या गोष्टीचा सहाजिकच त्रास होतो.
आता कोणी म्हणेल की त्रास होतो तर दुकान मांडून कशाला बसले हा प्रश्न ज्याच्या त्याच्या जागी व्यवस्थित असेल नसेल
आपण व्यवस्थित नोंदणी केल्यानंतर व्हेरिफाय झाल्यावर आपल्याला सगळ्या प्रोफाइल निशुल्क पहावयास मिळतात.
मात्र कम्युनिटी गाईडलाईनुसार आम्ही कोणाचाही मोबाईल नंबर किंवा बायोडाटा कुणालाही परस्पर पूर्वसंमतीशिवाय शेअर करत नाही.
किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही.
तेव्हा विवाह फसवणुकीपासून ज्याचे त्यांनी सावध असावे.
किंवा विवाह फसवणुकीबाबत मराठा लग्न अक्षदा कुठलीच जबाबदारी स्वीकारत नाही किंवा आम्ही कोणाचे लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आहे कुठेच करत नाही.
कार्यपद्धती सर्व माहिती व्यवस्थित भरल्यावर आपली प्रोफाईल व्हेरिफाय होते
सर्व प्रोफाईल आपल्याला दिसू लागतात
प्रत्येक प्रोफाइलवर व लिस्टिंग पेजवर मराठा लग्न अक्षदा समुपदेशन, जाहिरात, ज्ञान माहिती इत्यादी अंगाने स्लाईड कम जाहिराती टाकत असते त्यावर क्लिक केल्यास आपण अधिक माहिती घेऊ शकता
👉🏼
खाली ब्लॉग सेक्शन आहेत त्यावर पण आपल्याला मजकूर वाचायला मिळतो
👉🏼 प्रत्येक प्रोफाइलच्या फोटो खाली रिक्वेस्ट बटन आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यावर रिक्वेस्ट ऍडमिन सेक्शनला जाते त्याची योग्य ती पडताळणी होते यासाठी आठ ते दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी कोणीही फोन करू नये
आपल्या रिक्वेस्ट नुसार आपली विनंती मिळते जुळती असल्यास दोन्ही बाजूला व्हाट्सअप मेसेज येत असतो त्याची प्रतीक्षा करा
नोंदणी केल्यावर आपल्याला मोफत दोन रिक्वेस्ट चे पॉईंट्स मिळतात
त्यानंतर आपण खाली सेटिंग वर असलेल्या बटन वर क्लिक करून शेअर ऍप / लिंक आपल्या कुटुंबात मित्राला नातेवाईकाला शेअर करून
लिंक ओपन करायला सांगा व त्या ठिकाणी आपला त्यांना प्राप्त होणारा रेफरल कोड टाकायला सांगा
त्या बदल्यात आपल्याला एका रिक्वेस्ट चे पॉईंट मिळतात
यामागचे कारण असे की अनेक सज्जन फुकट असल्यामुळे एका दिवसात पन्नास रिक्वेस्ट टाकून पण मोकळे होतात किंवा कुणी कुणालाही फोन करतं त्याचे दगड किंवा शिव्या अनेक वेळा आमच्या घरावर आलेले आहेत त्यामुळे हे सर्व करावा लागतं
व्हेरिफाइड प्रोफाईल ला आम्ही मर्यादित व्हाट्सअप ग्रुप च्या लिंक टाकत असतो त्या जॉईन करून आपणही त्या ग्रुपचे ॲडमिन बनू शकता आपल्या मित्र नातेवाईकाला त्यात ऍड करू शकता त्यावर आम्ही दररोज बायोडाटा टाकण्याचा प्रयत्न करत असतो मात्र व्हाट्सअप ग्रुप ची नियम सहिता पाळणे आवश्यक आहे
आपल्याला लिंक शेअर करायच्या नसतील तर सेटिंग मधील वॉलेट सेक्शन वर क्लिक करून वीस रुपयाचा रिचार्ज करू शकता
किंवा आपण आपल्या नात्यातील ओळखीतील मुलीची प्रोफाइल ओळखपत्रासह त्यात ऍड केल्यास व त्या ठिकाणी आपला रेफरंट क्रमांक टाकल्यास आपल्याला सात reqwest पाठवण्यासाठी पॉईंट्स मिळतात
त्यामुळे आम्हाला सर्वर भाडे एसएमएस चार्जेस व इतर मेंटेनन्स चार्जेस जो महिन्याला सात ते आठ हजार रुपये खर्च येतो त्यासाठी थोडाफार हातभार मिळतो
आपली काही अडचण असल्यास मदतीसाठी असलेल्या सेकशन वर जाऊन आम्हाला Hi मेसेज करा: येथे लग्न जुळतात कसे ? पहा पद्धती
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments